अमळनेर: महापुरुषांच्या विचारांचा वारसा जपत, क्रांतीसूर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ (मुंबई), शाखा अमळनेर यांच्या वतीने एका विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात पहिल्यांदाच हाडांच्या व नसांच्या आजारांवर प्रभावी ठरणारी ‘कायरोप्रॅक्टिक ट्रीटमेंट’ (Chiropractic Treatment) नाममात्र दरात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

