अमळनेर : शहरासह परिसरात एकाच दिवशी चार वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. मात्र, मुख्याधिकारी श्री. गणेश शिंदे यांच्या आदेशानुसार अमळनेर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने अत्यंत तत्परता दाखवत चारही ठिकाणी वेळेवर पोहोचून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविले. यामुळे होणारे मोठे नुकसान टळले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आगीच्या घटना खालील ठिकाणी घडल्या होत्या:
बोदर्डे (ता. पारोळा): येथील पांडुरंग पाटील यांच्या मक्याच्या शेताला अचानक आग लागली होती.
पैलाड भाग: दूध डेअरी परिसरातील चारा आणि शेणखताच्या ढिगाऱ्याला आग लागल्याने परिसरात धुराचे लोट पसरले होते.
सराफ बाजार: अग्रवाल डेअरीच्या बाजूला असलेल्या एका पडीत जागेत आग लागली होती. वर्दळीचा भाग असल्याने येथे भीतीचे वातावरण होते.
पिंपळाच्या झाडाला आग: ॲड. ललिता पाटील यांच्या घराजवळील पिंपळाच्या झाडाने अचानक पेट घेतला होता. या चारही घटनांची माहिती मिळताच मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी अग्निशमन दलाला तात्काळ पाचारण केले. अग्निशमन अधिकारी श्री. गणेश गोसावी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
कमी वेळात आणि अत्यंत कौशल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याच्या या मोहिमेत दिनेश बिऱ्हाडे, फारूक शेख, जफरखान पठाण, मच्छिंद्र चौधरी, भिका संदानशिव, वसीम पठाण, लखन कंखरे, आकाश बाविस्कर आणि अजय बिऱ्हाडे या कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. अग्निशमन दलाच्या या ‘क्विक रिस्पॉन्स’मुळे नागरिक आणि शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले आहेत.
अमळनेर : नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ दरम्यान निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अमळनेर नगरपालिकेच्या सफाई कामगारांसह इतर कर्मचाऱ्यांचा निवडणूक भत्ता अद्याप रखडल्याने…