तत्परता! संताजी नगर येथे सेफ्टी टॅंकमध्ये पडलेल्या गाईला अग्निशमन दलाने दिले जीवदान

     अमळनेर :येथील संताजी नगर भागात काल दि १० रोजी दुपारी एका भीषण दुर्घटनेत सुदैवाने गाईचे प्राण वाचले. दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास एक गाय अचानक पाण्याने भरलेल्या सेफ्टी टॅंकमध्ये पडली. ही बाब लक्षात येताच स्थानिक नागरिक श्री. भटू पाटील यांनी तात्काळ अग्निशमन विभागाला दूरध्वनीवरून याची कल्पना दिली.

प्रशासनाची वेगवान हालचाल

​     घटनेचे गांभीर्य ओळखून माननीय मुख्याधिकारी श्री. गणेश शिंदे यांनी तातडीने बचाव कार्याचे आदेश दिले. आदेश मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी रवाना झाले.

​असे राबवले बचाव कार्य

​     सेफ्टी टॅंक पाण्याने तुडुंब भरलेला असल्याने गाईचा जीव धोक्यात होता. मात्र, अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी कसलाही विलंब न लावता तांत्रिक कौशल्याचा वापर करून गाईला सुखरूप बाहेर काढले. या यशस्वी मोहिमेत खालील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला:

श्री. गणेश गोसावी (अग्निशमन अधिकारी)

​फारुक शेख

दिनेश बिऱ्हाडे (फायरमन)

​आकाश संदानशिव (फायरमन)

​नागरिकांकडून कौतुक

​     गाईला सुरक्षित बाहेर काढल्यानंतर संताजी नगरमधील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. अग्निशमन दलाच्या या समय  सूचकतेबद्दल आणि धाडसाबद्दल परिसरातील नागरिकांनी संपूर्ण टीमचे विशेष आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!