अंमळनेर : गेल्या ५५ वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे आयोजित ‘रोटरी उत्सवात’ यंदाचा मानाचा ‘रोटरी गौरव पुरस्कार’ (साहित्य क्षेत्र) ज्येष्ठ साहित्यिक सुभाष पाटील यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्या प्रदीर्घ साहित्य सेवेचा आणि उल्लेखनीय योगदानाचा गौरव या निमित्ताने करण्यात आला असून, हा सन्मान संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरला आहे.

