अमळनेर : खान्देशातील क्रिकेटप्रेमींसाठी मोठी आनंदाची बातमी असून खान्देश प्रीमियर लीग 2026 (KPL) या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खान्देशातील सर्वात मोठी क्रिकेट रणधुमाळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेला 19 मार्च 2026 पासून सुरुवात होणार असून 29 मार्च 2026 रोजी अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला भारतीय क्रिकेट संघ, रणजी ट्रॉफी, आयपीएल यांतील खेळाडूंची उपस्थिती मिळण्याची शक्यता आहे.

