बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोपींची चौकशी करून फाशीची शिक्षा व्हावी…. अमळनेर तालुक्यातील सरपंच संघटनेनी केली मागणी

अमळनेर प्रतिनिधी येथील तालुका सरपंच संघटनेनी बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुखच्या हत्यारांना फाशीची शिक्षा व्हावी, करिता शासनाला दिले निवेदन.

सविस्तर वृत्त असे की,बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये मस्साजोग गावातील लोकप्रिय सरपंच संतोष देशमुख यांची दिनांक ९ डिसेंबर २०२४ या रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.सदर घटना ही मानवतेला काळिमा फासणारी आहे. सदर हत्या राजकीय सुडातून झाल्याची चर्चा होत आहे. सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून क्रूरपणे हत्या करण्यात आली.संपूर्ण महाराष्ट्रात भयावहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या हत्येची उच्चस्तरीय सखोल चौकशी करून जे जे आरोपी असतील त्यांच्या वर कठोर कार्यवाही करून फाशीची शिक्षा व्हावी,राज्यातील सरपंच यांची सुरक्षा हा मुद्दा शासनाने लक्षात घ्यावा व सरपंच संतोष देशमुख ची हत्या करणाऱ्यां नराधमाना कठोर शिक्षा व्हावी व त्यांच्या कुटुंबाला योग्य न्याय मिळवून द्यावा म्हणून अमळनेर तालुक्यातील सरपंच संघटनेने आपल्या भावना प्रांताधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देऊन शासनाला कळविले आहे.

सदर निवेदनावर दामोदर खैरनार, राजीवकुमार पाटील,भैय्यासाहेब पाटील,मनीषा पाटील, केदारसिंग जाधव,सुनील पाटील,पंकज निकम,उदय पाटील,प्रेमराज पाटील, नरेंद्र पाटील, उमाकांत पाटील, राजेंद्र पाटील,इंदूबाई पाटील, कोकिळा पाटील,विवेक पाटील, प्रा डॉ शशिकांत पाटील, चेतन पाटील, भारती पाटील,नितीन पाटील, समाधान पारधी,सौ रजनी पाटील आदीं सरपंचच्या स्वाक्षरी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!