शेतीत बियाणे, खते, कीडनाशके आदी निविष्ठांचा वापर अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्यामुळेच अत्यन्त दक्ष राहून त्यांची खरेदी करायला हवी. त्यासाठी काही गोष्टी माहीत करून घेतल्यास आपली फसवणूक टाळणे शक्य होईल.
बीज प्रमाणीकरण : बियाण्या बाबतीत बाजारात प्रमाणित बियाणे व सत्यतादशक बियाणे विक्रीस येते.बियाणे अधिनियमातर्गत विविध राज्यामध्ये बियाणे प्रमाणीकरणा साठी बीज प्रामाणिकरण यंत्रणा स्थापन करण्यात आल्या आहेत.
प्रमाणित बियाणे उत्पादनासाठी सीड़ प्लॉटस घेतले जातात.त्यांना बीज प्रमाणिकरण यंत्रणेचे अधिकारी वेळोवेळी भेट देत असतात. त्याच्या मार्गदर्शना खाली चाचण्या घेतल्यानतर या यत्रणेमार्फत बियाणे प्रमाणीकरण केले जाते. बियाणे उत्पादक कंपनीत अधिसूचित व अधिसूचित नसलेल्या वाणाचे बीजोत्पादन करू शकते. अधिसूचित नसलेल्या वाणाचे बीजोत्पादन करू शकते. अधिसूचित नसलेल्या वाणाबाबतीत बियाण्याच्या पिशवीवर सत्यदर्शक लेबल लावून त्याची विक्री केली जाते. या बियाण्याच्या दर्जाबाबत स्वतः बियाणे उत्पादक खात्री देत असतो.
बियाणे खरेदी करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी पुढ़ील प्रमाणे दक्षता घ्यावी.
१) परवानाधारक विक्रेत्या कडूनच बियाण्याची खरेदी करावी. प्रामुख्याने बीज प्रमाणीकरण यंत्रणेने प्रमाणित केलेले बियाणे खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे.
२) बियाणे खरेदीची विक्रेत्या कडूनच बियाण्याची खरेदी करावी. प्रामुख्याने बीज प्रमाणीकरण यंत्रणेने प्रमाणित केलेले बियाणे खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे.
३) बियाणे खरेदीची विक्रेत्याकडून पक्की पावती घ्यावी. त्यावर शेतकयाचे पूर्ण नाव, पत्ता, पिकाचे नाव,प्रकार, जात, प्लॉट नंबर उ्पादकाचे नाव, विक्रीची किमत असावी.पावतीवर विकेत्याची व शेतक्याची सही वा अंगठा असावा.कच्चे बिल स्वीकारू नये.
४) ब्रियाणे खरेदी करताना पिशवीच्या लेबलवरील माहिती पाहावी. या लेबलवर पिकाचे नाव व त्यात, पिकाची उगवण शत्ती, भौतिक व आनुर्वशिक शुद्धता टक्केवारी,बियाणे चाचपणीची तारीख, महिना व वर्ष, वजन, बीज प्रक्रियेसाठी वापरलेले रसायन, किमत आदी गोष्टीचा उल्लेख तपासावा.
५) बियाणे पिशवीवर असलेल्या किमती पेक्षा जास्त भावात बियाणे खरेदी करू नये. आंतरराज्य वस्तूच्या पॅकिगवर किमत छापणे काययाने बंधनकारक आहे.
बियाणे पिशवीवर किमत छापली नसल्यास किवा विक्रेता पिशवीवरील किमतीपेक्षा जास्त किमतीची मागणी करीत असेल तर ही बाब जिल्हा वजनमापे निरीक्षकाच्या निदर्शनास आणावी. या विभागाचे अधिकारी जिल्हा व तालुका स्तरावर कार्यरतअसतात.
६) बियाणे खरेदी पावतीवर छापील बिल क्रमांक असल्याची खात्री करावी. बियाण्यासाठी पिशवी ही तीनही बाजूनी शिवलेली असावी. वरची बाजू ही प्रमाणपत्रासह शिवलेली असते. पेरणीसाठी पिशवी फोडताना ती खालील बाजूने फोडावी. त्यामुळे पिशवीस असलेले लेबल व बीज प्रमाणीकरण यंत्रणेचा टॅंग व्यवस्थित राहील, लेबल,बॅग जपून ठेवावे.
७) मुदतबाह्म झालेले, तसेच पैकिंग फोडलेले सुटे बियाणे खरेदी करू नये.
८) बियाण्या विषयी काही तक्रार असेल तर तालुका कृषी अधिकारी, पचायत समिती किवा जि.प. कृषी विभागाकडे लेखी तक्रार करावी.
९) सत्यतादर्शक बियाण्या मध्ये प्रमाणीकरण यंत्रणेचे प्रमाणपत्र वगळता अन्य सर्वबाबी वरीलप्रमाणे असतात.
৭০) बियाणे भावफलक दर्शनी भागात लावून त्यावर कंपनी निहाय, जाती निहाय बियाणे साठा व दर नमूद करावेत,
११) सत्यतादर्शक बियाण्याच्या पिशवीवर एकच लेबल असल्याची खात्री करावी. लेबलवर दिशाभूल करणारा कोणताही मजकूर नसावा.
१२) बियाण्याची विक्री परवाना घेऊनच करावी.बियाणे खरेदीची पक्की पावती करावी. त्यावर वरील प्रमाणे सर्व मजकूर यावा. बियाणे, खरेदी विक्री चा मासिक अहवाल गटविकास अधिकारी व कृषी विकास अधिकारी यांना नियमित सादर करावा.
१३) परवाना दिलेल्या ठिकाणीच बियाण्याची विक्री किवा साठा करावा. बियाणे परवाना शेतकऱ्यास दिसेल अशा ठिकाणी लावावा.
शेतकरयांची निविष्ठाबाबत फुसवणूक होऊ नये म्हणून अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ याकायद्या अंतर्गत पुढील प्रमाणे कायदे तयार करण्यात आले आहेत.
बियाणेः बी-बियाणेअधिनियम १९६८ बी- बियाणे नियम १९६८ बियाणे(नियंत्रण) आदेश १९८३.
शेतकरी बांधवानी फसगती पासून सावध रहावे. आपल्या परिसरात बोगस बियाणे विक्रीसाठी असल्यास किंवा आपली फसगत झाली असल्यास कृपया करडी नजर न्यूज शी संपर्क साधावा.
