अमळनेर येथीलमुस्लिम समाज तर्फे स.अलैहि व सल्लम मुहम्मद पैंगबर यांच्या विरुद्ध केलेल्या अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या शर्मिष्ठा विरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी
सविस्तर वृत्त की,अमळनेर मुस्लिम समाजाच्या वतीने पी आर शर्मिष्ठा यांनी अंतिम प्रेषित मुहम्मद (स.अ.सल्लम) यांच्या बद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्या मुळे केवळ धार्मिक भावना दुखवतातच असे नाही तर समाजात तनाव आणि व्देष निर्माण करतात.
पुणे सम्बायोसिस काॅलेजची विद्यार्थीनी पी आर शर्मिष्ठाला कायदेची भाषा समजते तीने प्रषितांवर अभद्र विधाने केल्या बद्दल कठोर कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी प्रभावी पावले उचलावीत अशी मागणी मुस्लिम समाजा तर्फे करण्यात आली. सदर निवेदन अमळनेरचे प्रांत अधिकारी नितीन कुमार मुंडावर यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपति,भारताचे प्रधानमंत्री , गृहमंत्री, यांना देण्यात आले.तसेच सदर निवेदनात त्यात पुढे म्हंटल आहे कि आम्हाला विश्वास आहे कि शासन प्रशासन या प्रकरणात योग्य ती करवाई करेल आणि धार्मिक सालोखा रखण्यास हातभार लावेल. आम्ही सर्वाना धार्मिक सालोखा आणि परस्पर आदार वाढवण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन करतो.समाजात शांतता आणि सुव्यवस्था रखण्यासाठी सर्वजण एकत्र काम करूं शकतो आसा आमचा विश्वास आहे.
प्रांत अधिकारी नितिन कुमार मुंडावर साहेब यांना मौलाना रियाज़ शेख यांनी निवेदन सार्वजनिकरित्या वाचून दाखवली आणि ते स्वीकारल्या नंतर मुस्लिम समुदायात असलेल्या संतापाची माहिती दिली आणि शर्मिष्ठावर त्वरित कार्रवाई करण्याची मागणी केली.
निवेदन देतांना समाजवादी चे इकबाल कुरेशी, अल्तमश शेख, आकिब अली, इमरान भाया, शाहरुख सिंगर, मोहसिन जडी बुटी, हाफीज़ तौसीफ, इमरान शेख हाजी कादर जनाब, फैजान शेख, रिज़वान मनियार,अफजान शेख आदि मान्यवर उपस्थित
