अमळनेरमध्ये सर्व धार्मियांचे मेणबत्ती रॅलीद्वारे पहलगाम हल्ल्यातील दहशतवादाचा निषेध व भावपूर्ण श्रद्धांजली

अमळनेर, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अमळनेरमध्ये एक भव्य मेणबत्ती रॅली काढण्यात आली. अल्लामा फजले हक खैराबादी (रहे) स्टडी सेंटर अँड पब्लिक लायब्ररीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात शेकडो नागरिकांनी सहभाग घेत शांततेत दहशतवादाचा तीव्र निषेध केला.

मेणबत्ती रॅलीची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून झाली व साने गुरुजी पुतळ्यापर्यंत रॅली पुढे सरकली. रॅली दरम्यान “पाकिस्तान मुर्दाबाद”, “आतंकवाद मुर्दाबाद” अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. नागरिकांच्या एकमुखी घोषणांनी परिसर दणाणून गेला आणि सर्वत्र देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.

या रॅलीत रियाज मौलाना, तिला पाटील, सुलोचना वाघ, शीला पाटील मॅडम, वसुंधरा लांडगे, रणजित शिंदे सर यांच्यासह हिंदू-मुस्लिम बांधव व बोहरी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांनी एकत्रितपणे मेणबत्त्या पेटवून आणि सामूहिक श्रद्धांजली अर्पण करून मृतात्म्यांच्या शांतीसाठी प्रार्थना केली.

कार्यक्रमात बोलताना उपस्थित मान्यवरांनी दहशतवादाचा तीव्र निषेध व्यक्त केला. “दहशतवाद हा मानवतेसाठी घातक आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन शांतता आणि सौहार्द टिकवले पाहिजे,” असे मत व्यक्त करण्यात आले.

या भावपूर्ण रॅलीतून अमळनेर शहराने एकतेचा, शांततेचा आणि दहशतवादाविरोधातील ठाम भूमिका दाखवली. नागरिकांनी मेणबत्ती रॅलीला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने कार्यक्रम यशस्वी झाला. सुभाष अण्णा , अशोक पवार सर,राजु महाले सर,बी के सुर्यवंशी, मनोज पाटील,भागवत अण्णा,ऍड शकील काजी, मनोहर नाना,प्रा.विनय जोशी सर,प्रा.शीला पाटील,तीलोतमा पाटील, सुलोचना वाघ, ऍड तीलोतमा पाटील, वसुंधरा लांडगे, संदीप घोरपड़े, अखलाक भाई, जहुर मुतवल्ली, फय्याज भाई, दबीर पठान, मोहम्मद भाई बोहरी, हाजी सूपडु, गयास अहलकार, रुकनोद्दीन अहलेकार, अहमद अली, शराफ़त अली,अ.खालीक अहलेकार,अहतेशाम भाई, शकील सर, बहुसंख्यांने मान्यवर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!