पारोळा शेवगे येथील मेव्हण्याने विमा रक्कमा मिळावे म्हणून स्वतःच्या शालकाचा खून अमळनेर तालुक्यातील खवशी येथील एकाच्या मदतीने केल्याची घटना उघडकीस आली. पोलिसांनी दोन्ही आरोपीना केली अटक.
सविस्तर वृत्त की, धुळे जिल्ह्यातील फागणे येथील समाधान शिवाजी पाटील याचा अपघाती मृत्यू झाल्याप्रकरणी १९ एप्रिल रोजी पारोळा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. डीवायएसपी विनायक कोते , पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमरसिंग विसावे, पोहेकॉ सुनील हटकर,संजय पाटील,अनिल राठोड,अभिजीत पाटील यांनी तपासाची यंत्रणा फिरवली असता पोलिसांच्या करडी नजरने यात काहीतरी वेगळे असल्याचं जाणवले.

यात मयताचा शालक संदीप भालचंद्र पाटील (वय ४०) (रा.शेवगे ता.पारोळा) तसेच चंद्रदीप आधार पाटील (वय ४५) (रा.खवशी ता.अमळनेर) यांनी कट रचून समाधान पाटील याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे.संदीप पाटील याने आपला शालक समाधान पाटील याच्या नावावर विमा पॉलिसी काढून ठेवल्याचे उघडकीस आले तसेच अपघातात वापरलेली स्कुटी एम एच ५४ ए ९५१३ ही देखील पूर्णपणे इन्शुरन्स होती.समाधान चा खून करून त्याची विमा पॉलिसी रक्कम व दुचाकीची विमा रक्कम आपल्याला मिळावी या हव्यासापोटी समाधान चा खून लोखंडी रॉड मारून केल्याचे उघडकीस आली आहे. पोलिसांनी दोघा आरोपीना अमळनेर तालुक्यातून अटक करून न्यायलयात उभे केले असता मेहरबान कोर्टाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास डीवायएसपी विनायक कोते करीत आहेत.
