पावसाळ्याच्या पारश्वभूमीवर नपा आरोग्य विभागाची युद्ध पातळीवर नाले सफाईला सुरुवात….

 

अमळनेर येथील नपा च्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून पावसाळ्याच्या पारश्वभूमी वर शहरातील नाले सफाई मोहिमेला सुरुवात केली आहे.

सविस्तर वृत्त की, शहरातील अनेक नागरी वस्तीत पावासाळ्या पाणी तुडुंब भरत असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जात आहे. अनेकदा सरपटनारे जीव जंतू घरात घुसतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्या सह जीविताला मोठा धोका निर्माण होतो.या गोष्टीनां प्रतिबंध बसावा व आरोग्यदायी जीवन जगता यावे म्हणून खबरदारी घेतला नाले सफाईला सुरुवात केली आहे.१८ नाल्यांची सफाई करण्याकामी दोन जेसीबीची मदत घेण्यात आली आहे.

       अमळनेर शहरात एकूण १८ नाले असून त्यात आठ मोठे व दहा लहान नाले आहेत. वर्षभरात या नाल्यांमध्ये सुमारे ४०० टन गाळ साचतो. त्यामुळे पावसाळ्यात नाले तुडुंब भरून वस्त्यांमध्ये,कॉलनीत ,रस्त्यांवर घाण पाणी ओसंडून वाहते. त्याचे परिणाम दैनंदिन जीवनावर होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. ऐन पावसाळ्यात नाले सफाई करता येत नाही. 

      मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी अभियंता डिगंबर वाघ , आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे , आरोग्य निरीक्षक किरण कंडारे ,आरोग्य समन्वयक गणेश गढरी , मुकादम ज्ञानेश्वर संदानशिव , श्यामराव करंदीकर , महेंद्र बिऱ्हाडे , प्रवीण बिऱ्हाडे ,योगेश पवार , सतीश बिऱ्हाडे ,भरत आगळे यांचे पथक नेमून एप्रिल महिना अखेरीपासूनच नाले सफाईची जबाबदारी देण्यात आली आहे. ढेकू रोडवर आणि आर के नगर च्या पाठीमागे नालासफाईला सुरुवात करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!