बाल हक्क व न्यायासाठी नवी दिल्लीत राष्ट्रीय सल्लामसलत परिषद; अमळनेरच्या ‘आधार’ संस्थेचा सहभाग

नवी दिल्ली (विशेष बातमी): बालकांचे हक्क, क्षमता आणि समृद्धी सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने ‘जस्ट राइट्स फॉर चिल्ड्रन’ (JRC) तर्फे २७ ते ३० जुलै २०२६ दरम्यान नवी दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे चार दिवशीय राष्ट्रीय सल्लामसलत परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

केन्द्रीय महिला व बाल विकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर, खासदार लालू कृष्ण आणि JRC चे संस्थापक भुवन ऋभू यांच्या प्रमुख उपस्थितीत या परिषदेचे उद्घाटन झाले. या प्रसंगी बाल लैंगिक शोषण, बालविवाह, बाल तस्करीत रोखणे आणि बालकांना सुलभ न्याय मिळवून देणे यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. बालकांच्या सुरक्षेसाठी शासन, न्यायव्यवस्था आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

देशभरातील विविध तज्ज्ञ व संस्थांचा सहभाग असलेल्या या महत्त्वाच्या परिषदेत ‘आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर (जि. जळगाव)’ च्या प्रतिनिधींनी देखील सहभाग नोंदवला आहे. या माध्यमातून बाल हक्क संरक्षण आणि सामाजिक कार्याचा अनुभव अधिक सक्षम होण्यास मदत होणार असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!