दुसऱ्यांदा टाकरखेड्यात जुगार अड्ड्यावर धाड…१२ जणांना अटक तर २ लाख रुपये जप्त 

अमळनेर शहर प्रतिनिधी, येथील टाकरखेडा गावाच्या परिसरात दुसऱ्यांदा जुगार अड्डयावर धाड पडल्याने पोलिसांचा धाक कमी झाला की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान पोलिसांनी 12 जणांना ताब्यात घेतले असून तब्ब्ल दोन लाख रुपये जप्त करण्यात आल्याचे समजते.

सविस्तर वृत की, मागील प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांनी आपल्या प्रशिक्षण कालवधीत शहरातील जवळपास सर्वच जुगार अड्डे बंद केले होते.त्यामुळे जुगार अड्डे चालवीणाऱ्यांनी सदरच अड्डे हे ग्रामीण भागात सुरु केल्याचे चित्र निर्माण झाले होते.प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी बारबोले यांनी याच टाकरखेडा गावाच्या परिसरात चालणाऱ्या जुगार अड्डयावर धाड टाकून मोटारसायकली सह जुगार अड्डा चालवीणाऱ्या व खेळणाऱ्या व्यक्तींना मुद्देमाल सह अटक केली होती.

मात्र आता शहरा सह गावाखेड्यात सदरचे जुगार अड्डे पुन्हा जोमाने सुरु झाल्याचे बोलले जात आहे. त्याची प्रचिती नुकतीच पाहायला मिळाली आहे.पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिळालेल्या माहिती नुसार टाकरखेडा शिवारातील कंडारी रस्त्यावरील गट नंबर १८० मधील समाधान धर्मा पाटील पाटील यांच्या शेतात पत्त्यांचा जुगाराचा अड्डा सुरू असल्याचे समजले. सहानिशा करून सदर झन्ना मन्ना जुगार खेळणाऱ्या जुगार अड्ड्यावर आपल्या पोलिस सहकाऱ्याच्या मदतीने धाड टाकून धरणगाव ,एरंडोल व अमळनेर येथील १२ जणांना अटक करून त्यांच्याजवळुन २ लाख ४२० रुपये जप्त केले आले .

 सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव बोरकर , संदीप धनगर ,विनोद संदानशिव , अमोल पाटील ,जितेंद्र निकुंभे , गणेश पाटील ,उज्वलकुमार म्हस्के , प्रशांत पाटील,चरणदास पाटील, उदय बोरसे , राहुल पाटील,नरेश बडगुजर आदीनीं केली.

 धाडीत समाधान धर्मा पाटील वय ४० रा टाकरखेडा , पुंडलिक दोधु पाटील वय ४९ रा लहान माळी वाडा धरणगाव , रवींद्र दशरथ महाजन वय ३३ नागोबा मढी एरंडोल , चेतन उर्फ नाना ज्ञानेश्वर महाजन वय २६ नागोबा मढी एरंडोल , धनराज दिलीप पाटील वय ३५ रा कुंभारटेक तेलीवाडा अमळनेर , सैनिक अशोक कोठारी वय ४० रा वडचौक , पंढरीनाथ धनलाल माळी वय ५५ रा मोठा माळीवाडा धरणगाव , पुनमचंद गोपीनाथ बाविस्कर वय ४० रा माळीवाडा धरणगाव , किशन किरण ओतारी वय २५ रा कुंभारटेक अमळनेर , केशव किरण पाटील वय ३५ रा निशाणे ता धरणगाव , किरण गुलाब पाटील वय ४२ रा लोणे ता अमळनेर , जितेंद्र रघुनाथ कोळी वय ४३ रा टाकरखेडा याना पकडून त्यांच्या जवळून २ लाख ४२० रुपये जप्त करण्यात आले. सर्व आरोपीं विरुद्ध मुंबई जुगार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!