अमळनेर शहर युवासेनेच्या अल्पसंख्याक शहरप्रमुखपदी शेख अल्ताफ यांची नियुक्ती….शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून नियुक्तीपत्र देत पक्षविचारांचा प्रचार-प्रसार करण्याचे आवाहन

अमळनेर : शिवसेना पक्षाच्या अमळनेर शहरातील संघटनात्मक बांधणीला बळकटी देताना युवासेनेच्या अल्पसंख्याक शहरप्रमुख (अमळनेर शहर) पदावर शेख अल्ताफ राजा फारुख यांची पुढील एक वर्षाच्या कालावधीसाठी तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील, जळगाव लोकसभा संपर्कप्रमुख आ. दिलीप मामा लांडे यांच्या सूचनेनुसार आणि माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख वासुदेवजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

नियुक्तीपत्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीचा सक्रियपणे प्रचार व प्रसार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करावे आणि पक्षाचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

या नियुक्तीबद्दल नवनियुक्त पदाधिकाऱ्याचे अभिनंदन करून आगामी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. नियुक्तीपत्रावर माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांची स्वाक्षरी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!