महिला व विद्यार्थ्यांसाठी DL Social Foundationचे मोफत संगणक प्रशिक्षण….पहिल्या बॅचमध्ये १० प्रशिक्षणार्थींना प्रवेश; प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्राचे वितरण

अमळनेर : डिजिटल युगात संगणकाचे ज्ञान ही काळाची गरज बनली असून, महिला व विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने DL Social Foundation, अमळनेरतर्फे Community Development & Empowerment Project अंतर्गत एक महिन्याचे मोफत संगणक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

या उपक्रमाच्या पहिल्या बॅचमध्ये केवळ १० प्रशिक्षणार्थींना प्रवेश दिला जाणार असून, प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. संगणकाच्या मूलभूत ज्ञानासह डिजिटल तंत्रज्ञानाचा आत्मविश्वासाने वापर करण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे.

इच्छुक महिला व विद्यार्थ्यांनी समर्थ नगर, धुळे रोड, अमळनेर येथील संस्थेच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन नावनोंदणी करावी. प्रवेश मर्यादित असल्याने इच्छुकांनी लवकर नोंदणी करावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ७७९६११२८९४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!