अमळनेर येथील महिलेला वैयक्तिक लैंगिक व्यवसाय करण्याचा अधिकार असून तिला तिच्या घरातून कोणी काढू शकत नाही आणि कोणी बळजबरीने वेश्या व्यवसाय चालवत असेल तर विरोध करण्यासाठी आम्हीच पुढे येऊ अशी माहिती ऍड .ललिता पाटील यांनी लैंगिक कामगार महिलांच्या स्वाधार संघ आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

सविस्तर वृत्त असे की, गांधलीपुरा भागातील वेश्या व्यवसाया विरुद्ध स्थानिक सामाजिक कार्यकर्ते कुदरत अली यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या बाबत नुकत्याच लागलेल्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत काही लोक लैंगिक कामगार महिलांना दमबाजी करून दहशत निर्माण करीत मालमत्ता जप्त होईल अशी चर्चा होत असल्याने सदर लैंगिक कामगार महिलांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
पत्रकार परिषदेत ऍड ललिता पाटील यांनी सांगितले की, सदर महिलांना देखील स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे आणि समाजात या महिला आहेत म्हणून इतर महिला सुरक्षित आहेत. न्यायालयाने या भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश दिले आहेत मात्र कॅमेरे बंद आहेत ते सुरू झाले पाहिजेत.नुकत्याच लागलेल्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत काही लोक लैंगिक कामगार महिलांना दमबाजी करून दहशत निर्माण करीत आहेत. त्यांची मालमत्ता जप्त होईल असे सांगत आहे.सदर महिलांना यातून बाहेर पडायचे आहे मात्र जीविका कशी करायची हा प्रश्न आहे.
ऍड सलीम खान यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत सांगितले की महिलेला वैयक्तिक तिच्या मर्जीने लैंगिक व्यवसाय करता येतो. न्यायालयाने त्यांचे पुनर्वसन करण्याचेही निर्देश दिले आहे मात्र पुनर्वसन होत नाही.
लैंगिक कामगार – जर १८ वर्षाखालील मुलीन कडून व्यवसाय करून घेतो अशी शंका असेल तर केव्हांही छापा टाका. सीसीटीव्ही कॅमेरे लावा दोषी आढळलो तर अवश्य कारवाई करा पण हेतुपुरस्कर त्रास देऊ नका.
या पत्रकार परिषदेत ऍड ललिता पाटील , ऍड सलीम खान , डॉ भारती पाटील , रेणु प्रसाद हजर होते.
