अमळनेर ढेकू रोड येथील विश्वकर्मा मंदिरात विश्वकर्मा सुतार समाजाच्या वतीने प्रभू विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर होते. यावेळी उपनगराध्यक्ष इंजि. प्रशांत निकम, प्रवक्ते प्रा. डी. डी. पाटील, माजी कुलगुरू एस. ए. पाटील यांच्यासह समाजातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

