अमळनेर : कैलासवासी आप्पासाहेब नामदेव पाटील यांच्या सामाजिक कार्याचा वसा घेऊन प्रभाग क्रं १ मध्ये स्थानिक नागरिकांच्या सेवे साठी इच्छुक उमेदवार कैलास नामदेव पाटील यांना प्रभागात प्रचंड प्रतिसाद नागरिक देतांना दिसत आहे.
प्रभागातील प्रत्येक नागरिकांच्या मनावर अधिराज्य करणारे नेते कैलासवासी नामदेवराव पाटील यांच्या समाजकार्याचा वारसा पुढे नेणारे कैलास नामदेव पाटील आता जनसेवेचा वसा राजकारणाच्या माध्यमातून पुढे नेत आहेत.
प्रभाग क्रमांक १ मधील मतदारांमध्ये त्यांना जबरदस्त पाठींबा मिळत असून, त्यांच्या प्रचाराला अक्षरशः जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा लाभत आहे.
कैलास पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि धर्मामिक क्षेत्रात सक्रिय असून, प्रत्येक घटकाला मदतीचा हात देण्याचा त्यांच्या स्वभावामुळे मतदार स्वतःहून विजयी भव चा आशीर्वाद देतांना दिसत आहे.कोविड काळात तसेच पूरग्रस्तांना मदत करताना त्यांनी दाखवलेले कार्य आजही जनतेच्या लक्षात आहे. “जनतेची सेवा हेच माझे राजकारण,” असे स्पष्ट मत ते मांडतात.
प्रभाग क्रमांक १ मध्ये प्रत्येक गल्लीबोळात कैलास पाटील यांचा जनसंपर्क दौरा जोरात सुरू आहे. नागरिकांशी आत्मीयतेने संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकून घेण्याची त्यांची पद्धत सर्वांना भावते आहे. अनेक नागरिकांनी “कैलासभाऊ आमचे खरे सेवक आहेत, त्यांना यावेळी संधी मिळालीच पाहिजे” असे मत व्यक्त केले आहे.
स्थानिक विकासाचे नवे दालन उघडण्यासाठी आणि समाजकार्याचा विस्तार करण्यासाठी कैलास पाटील यांना मिळणारे हे जनसमर्थन आगामी निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.