जळगांव मध्ये राहणाऱ्या डॉ बाविस्कर यांना मतदार स्वीकारतील का?

अमळनेर येथील न पा निवडणुकीत व्यवसायाने डॉक्टर असलेले जळगांव मध्ये वास्तव्यास असलेले डॉ परीक्षित बाविस्कर यांना शहर विकास आघाडीने नाकारले आणि त्यांनी उडी मारली ती शिंदेच्या शिवसेनेत.

     अलीकडेच अंमळनेरकरानां परिचित झालेले डॉ परीक्षित बाविस्कर यांनी न पाच्या निवडणुकीत उडी तर घेतली मात्र मतदारांशी साधी तोंड ओळख नसल्याने मतदारा समोर जातांना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागणार आहे.निव्वळ अमळनेर मध्ये घर असून चालत नाही तर जन संपर्क असावा लागतो, अशी ही चर्चा सुज्ञ नागरिक करतांना दिसत आहे. डॉ बाविस्कर हे शहराचा विकास साधणार तरी कसा ? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे.कारण व्यवसायाने डॉक्टर असल्याने त्यांचा अनेक वर्षा पासून निवास हा जळगांव मध्ये आहे.त्यांनी निवडणुकीत उमेदवारी करायची म्हणून अलीकडेच अंमळनेर मध्ये वास्तव करणार असल्याची ही चर्चा होत आहे.

      अमळनेर मध्ये अनेक समस्या आवासून आहेत. आरोग्याचा प्रश्न,निकृष्ट रस्ते, गटारी तसेच शहरातील राजकीय वरद हस्त असल्यामुळे वाढते अतिक्रमनाचा यक्ष प्रश्न, विजेचा लपंडाव इत्यादी सारख्या समस्या सोडविण्यासाठी शहरात वास्तव्य करणाऱ्याला व वेळेवर भेट घेऊन नागरिकांच्या समस्या सोडविणारा नगराध्यक्ष नागरिकांना अपेक्षित आहे.

   यावर डॉ बाविस्कर कोणता तोडगा काढतात ?  हे पहाने उत्सुकतेचे ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!