गुरुकृपा कॉलनी रहिवासीनी केली नगर परिषदेकडे रस्ते व गटार दुरुस्तीची मागणी

अमळनेर धुळे रोडवरील कॉटन मार्केटच्या मागे असलेल्या गुरुकृपा कॉलनीचे रहिवासीनी नगर परिषदेकडे रस्ते व गटार दुरुस्तीची मागणी केली आहे. याबाबत नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की सन १९९९ पासून अस्तित्वात असलेली ही कॉलनी आजपर्यंत विकासापासून वंचित राहिली आहे. विशेषतः भालेराव नगरला लागून असलेल्या तीनही गल्ल्यांमध्ये चांगले रस्ते नाहीत. गटारी जीर्ण झालेल्या आहेत, ठिकठिकाणी तुटलेल्या आहेत. यामुळे पाण्यात राहणारे सापांचाही उपद्रव वाढला आहे. परिणामी, कॉलनीतील नागरिक भयभीत झाले आहेत.त्यामुळे ग्रामस्थांनी नगर प्रशासनाकडे रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्याची आणि गटारी दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. जर त्यांच्या मागण्यांची दखल घेतली गेली नाही तर नगर परिषदेसमोर उपोषणाला बसण्याचेही म्हटले आहे,
या निवेदनावर हरीचंद्र कढरे, वसंत काटे,राजू कांबळे,सुदाम बाविस्कर, सचिन संदानशिव, विशाल सोनवणे, मानस ठाकरे,सुरेश संसारे,निंबा मैराळे आदी च्या सह्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!