अमळनेर: साने गुरुजी विद्यालयाचा ‘एन.एम.एम.एस.’ परीक्षेत ऐतिहासिक उच्चांक; १६ विद्यार्थी गुणवत्ता यादीत!

       अमळनेर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत (NMMS) अमळनेर येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाने देदीप्यमान यश संपादन केले आहे. विद्यालयाचे तब्बल १५ विद्यार्थी आणि साने गुरुजी कन्या हायस्कूलची १ विद्यार्थिनी, अशा एकूण १६ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शाळेच्या यशाचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे.
​या घवघवीत यशामुळे शाळेत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांना इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंत दरमहा १,००० रुपये, म्हणजेच एकूण ४८,००० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.


यशस्वी गुणवंतांची नामावली:निवड यादीत स्थान मिळवलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे:

मोहित रमेश पाटील, शिवम मनोहर पाटील, विराज दीपक पाटील, गोपाल किशोर शिंदे, दीपांशू योगेश पाटील, पियुष अरुण शिंदे, शिवम देविदास पाटील, ललित सुनील ठाकरे, चाणक्य प्रशांत पाटील, मनन राकेश पाटील, नरेश चंद्रकांत महाजन, पुष्कर विनोद शिंदे, हर्षल प्रदीप सोनवणे, भार्गव महेंद्र पाटील आणि पूरब राजू खंगार. तसेच कन्या हायस्कूलची संजना ज्ञानेश्वर अहिरे हिनेदेखील यश खेचून आणले.

पालक व विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा​      विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेत विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सहसचिव ॲड. अशोक बाविस्कर, संचालक गुणवंत पाटील, भास्करराव बोरसे, किरण पाटील, मुख्याध्यापक सुनील पाटील, अनिता बोरसे व शिक्षक प्रतिनिधी विलास चौधरी उपस्थित होते.

“या शिष्यवृत्तीचा उपयोग केवळ शैक्षणिक कार्यासाठीच करावा. हा आर्थिक लाभ तुमच्या उज्ज्वल भविष्याचा पाया ठरेल,” असे प्रतिपादन संदीप घोरपडे यांनी अध्यक्षीय भाषणात केले.

​मार्गदर्शकांचा मोलाचा वाटा

​      या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक सुनील पाटील, शिक्षक डी.ए. धनगर, तसेच कन्या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अनिता बोरसे व शिक्षिका मनीषा वैद्य यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तांत्रिक सहाय्यासाठी मुस्ताक शेख, शुभम निकम आणि दीपक महाजन यांनी परिश्रम घेतले.
​कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन मनीष उघडे यांनी केले. आभार प्रदर्शन डी. वाय. पाटील यांनी मानले. या यशाबद्दल संपूर्ण परिसरातून विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!