अमळनेर येथील गांधली ग्रामपंचायतला अचानक भेट देऊन पाहणी करत असतानां अशी ग्रामपंचायत माझ्या आयुष्यात पाहिलांदाच बघीतली असल्याचे गौरव ऊदगार याप्रसंगी श्रीमती मीनल करनवाल मुख्यकार्यकारी अधिकारी जळगांव यांनी काढले.

जळगांव जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांनी गांधली ग्रामपंचायतीस अचानक भेट देऊन ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांचा आढावा ग्रामविकास अधिकारी प्रमोद पाटील यांच्या कडून घेतला. सामाजिक उपक्रम मियावाकी फ़ॉरेस्ट (wipr ০xygen park ) ला भेट देऊन विप्रोच्या सहकार्याने झालेल्या जलसंधारण कामाची माहिती घेतली.
ग्रामविकास अधिकारी प्रमोद पाटील यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करून त्यांना शेतकऱ्यांना उपयुक्त अशी जीवन तारा योजना राबविण्यास संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

🤝💐🤝💐🤝💐🤝💐🤝💐🤝💐🤝💐
ग्रामपंचायतीच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत गिरीष पाटील व ग्रामविकास अधिकारी प्रमोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले,

याप्रसंगी पाहूण्यांच्या हस्ते ग्रामपंचायत आवारात वृक्षारोपण करण्यात आले. ग्रामपंचायत करत असलेल्या विविध उपक्रमा बद्दल उपस्थितानी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
गांधली ग्रामपंचायत सदस्यांचे आले उर भरून…
हे एकच वाक्य आमच्या सर्व ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी,अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी सह ग्रामस्थां साठी मोठे पारीतोषिक आहे,असे ग्रामपंचायतने म्हटले आहे.
याप्रसंगी पंचायत समिती गटविकास अधिकारी. एन. आर. पाटील,रावसाहेब एल डी चिंचोले, इंजी.पी.ए.पाठील, घरकुल अभियंता तेजस वाघ बोरसे, व इतर मान्यवर उपस्थित होते.
