जळगाव : सामाजिक बांधिलकी जपत आपणही समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून पाळधी येथील सूर्या फाउंडेशनच्या अध्यक्षा तसेच पाळधी नोबल इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका डॉ. सौ. अर्चना प्रशांत सूर्यवंशी यांनी आपल्या दिवंगत सासऱ्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ समाजहिताचा आदर्श निर्माण केला आहे.त्यांचे सासरे कै. भगवानराव सूर्यवंशी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या दहाव्या व इतर कार्यक्रमांसाठी होणारा खर्च टाळून तोच निधी सामाजिक कार्यासाठी देण्याचा निर्णय डॉ. अर्चना सूर्यवंशी यांनी घेतला. कै. भगवानराव सूर्यवंशी यांच्या ८६व्या वाढदिवसानिमित्त आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शैक्षणिक मदतीसाठी ५० हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

