अमळनेर : अमळनेर शहर व तालुक्यात नवीन वीजमीटर बसवल्यानंतर काही ग्राहकांना अवाजवी वीजबिले येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषी मीटरची तपासणी व दुरुस्ती करावी, तसेच ग्राहकांवर नवीन मीटर बसविण्याची अनावश्यक सक्ती करू नये, अशी मागणी युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रविण पुरुषोत्तम पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

