युवासेनेत अमन खाटिक यांचा दमदार प्रवेश….

अमळनेर : शिवसेना (शिंदे गट) चे माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अमन जाकीर खाटीक यांची युवसेना उपशहर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

युवासेनेच्या माध्यमातून पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचविणे, युवकांना संघटित करून सामाजिक व संघटनात्मक कार्याला बळकटी देणे, तसेच पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्याची जबाबदारी अमन खाटीक यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

या नियुक्तीबद्दल अमन जाकीर खाटीक यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्रपरिवाराकडून हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!