राज्य पत्रकार संघाच्या अमळनेर कमिटीची नवी कार्यकारिणी सज्ज!…..२४ पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण; पत्रकारांच्या न्यायहक्कांसाठी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन

अमळनेर : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या अमळनेर तालुका कमिटीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना रविवारी नियुक्तीपत्रांचे वितरण करून त्यांचा सत्कार करण्यात आला. तालुका कार्यकारिणीतील तीन उपाध्यक्षांसह २४ पदाधिकाऱ्यांना यावेळी नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रा. डॉ. विजय गाढे होते. प्रमुख पाहुणे म्हणून खान्देश विभाग अध्यक्ष डॉ. समाधान मैराळे, तालुका अध्यक्ष सुरेश कांबळे आदी उपस्थित होते.

यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर संघटनात्मक जबाबदारी सोपवून आगामी काळात संघटनेची बांधणी अधिक मजबूत करण्याचे आवाहन करण्यात आले. तालुक्यातील विविध भागांत पत्रकारिता करणाऱ्या पत्रकार बांधवांना संघटनेशी जोडून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रभावीपणे आवाज उठविण्याची गरज असल्याचे प्रा. डॉ. विजय गाढे यांनी सांगितले. पत्रकारांच्या अडचणी सोडविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी सक्रियपणे कार्यरत राहावे, असेही त्यांनी आवाहन केले.

खान्देश विभागातील पत्रकारांसाठी राज्य पत्रकार संघाची हेल्पलाईन सुरू करण्यात येणार असून, त्याद्वारे पत्रकारांना अडचणीच्या प्रसंगी तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती डॉ. समाधान मैराळे यांनी दिली. तसेच पत्रकारांसाठी आरोग्य विमा योजना राबविण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाची प्रस्तावना तालुका सचिव नूर खान पठाण यांनी केली. तालुका अध्यक्ष सुरेश कांबळे यांनी आभार मानले.

यावेळी हृदयनाथ मोरे, योगेश पाने, नूर खान पठाण, आत्माराम अहिरे, महेश संदानाशिव, गणेश चव्हाण यांच्यासह नवनियुक्त पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!