जळोद येथे अकराव्याच्या पूजेत मधमाश्यांच्या हल्ल्यात पुजाऱ्याचा मृत्यू

अमळनेर शहर प्रतिनिधी,जळोद येथील अकराव्या च्या पूजेत मधमाश्यांच्या हल्ल्यात पुजाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना ५ रोजी दुपारी साडे बारा वाजता जळोद येथे नदी काठावर घडली.

सविस्तर वृत्त असे की, जळोद येथिल स्व डॉ काकासाहेब देशमुख यांच्या ११ व्याची पूजा नदी काठावर पुजारी अमोल शुक्ल वय ३८ रा पाठक गल्ली अमळनेर यांनी जळोद नदीच्या पुलाखाली स्व देशमुख यांच्या मुली व मुलांसोबत पूजेचा होम पेटवला असता धूर झाल्याने पुलाखाली असलेल्या मधमाशांच्या पोळा पर्यंत धूर पोहचल्याने मधमाशा बिथरल्याने पूजेला बसलेल्यानां चावल्याने सर्व जण सैरावैरा पळू लागले. त्याचवेळी पुजारी अमोल शुक्ल यांनी सांगितले की कोणीही पळू नका खाली झोपून घ्या त्या चावणार नाहीत म्हणत ते खाली वाकले. मात्र सर्वात जास्त मधमाशा त्यांनाच तोंडाला चावल्या. आधीच त्यांना मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता. त्यामुळे जास्त त्रास होऊ लागला म्हणून उपचारासाठी त्यांना अमळनेर येथे दवाखान्यात आणत असताना रस्त्यातच श्वास बंद पडून त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान इतर पाच ते सहा जणांना देखील मधमाशा चावल्याने त्यांचे अंग सुजले होते. त्यांना अमळगाव ग्रामीण रुग्णालयात आणून उपचार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!