कोकोकोला सरांच्या प्रबोधनात्मक “सूलटी फिटिंग” कार्यक्रमाने उपस्थितां मध्ये झाले वैचारिक मंथन ….

अमळनेर प्रतिनिधी,येथील व्यवसायाने शिक्षक असलेले समुपदेशक कलाकार तथा प्रबोधनकार श्री आर बी पाटील तथा कोकोकोला सरांच्या “सूलटी फिटिंग”कार्यक्रमाचे आयोजन नवरात्र उत्सवात न्यू प्लॉट विकास परिसर मंचच्या वतीने करण्यात आला .

सविस्तर वृत्त असे की,समाजात अनेक विषयांच्या बाबतीत समज गैरसमज निर्माण झाले आहे. समाजातील तरुण वर्ग हा विज्ञाना पासून कोसो दूर जात असल्याने देशाच्या वैज्ञानिक विकासात मोठा अडथळा निर्माण होत आहे.अंधश्रद्धा बोकाळत चालली आहे .बेरोजगारी मुळे शिक्षणा कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे.याचा विपरीत परिणाम हा देशाच्या येणाऱ्या पिढीवर होऊ नये म्हणून झाडी गावां चे रहिवासी तथा व्यवसायाने शिक्षक असलेले श्री आर बी पाटील (कोकोकोला सर) हे गेल्या अनेक वर्षापासून निस्वार्थपने समाजात जाऊन विनोदी पद्धतीने समस्यांची मांडणी करून प्रबोधनात्मक कार्यक्रम करीत असतात.आर बी पाटील सर हे तालुक्यातील विविध शाळा,कॉलेज व गावखेड्या मध्ये जाऊन आपल्या कलेच्या माध्यमातून विद्यार्थं,महिला व पुरुष आणि शेतकरी बांधवांचे प्रबोधन कार्य करीत आहेत.

समाजातील शेतकऱ्यांच्या तरुण मुलांचे विवाह होण्यास अडथळे, त्यांच्यातील व्यसनाधीनता तसेच सुप्त गुणांना वाव आदी बाबतीत प्रबोधन ते सातत्याने करीत आहेत.त्यांच्या या कार्यात उच्च शिक्षित सौभाग्यवती प्रा प्रतिभा पाटील यांची देखील साथ लाभत आहे.

सध्या ठीक ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा होत आहे.असाच उत्सव न्यू प्लॉट भागात छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात “सूलटी फिटींग” हा कार्यक्रम आयोजित केला होता.या कार्यक्रमातून कोकोकोला सरांनी आपल्या एक तासांच्या कार्यक्रमात त्यांनी कोकोकोला म्हणजे तीन “क” व एक “ल” ची उत्तम प्रकारे फोड करून मुले,महिला आणि पुरुषांचे प्रबोधन केले.आपल्या विनोदी शैलीमुळे अधून मधून हास्याचे फवारे उडविले आणि सुरेल गीतांमधून त्यांनी समाजाला प्रबोधन केले.याला उपस्थितांनी प्रचंड दाद दिली.सर्वानी त्यांचे टाळ्यांनी कौतुक केले.विशेष बाब म्हणजे आर बी पाटील हे सदर चा कार्यक्रम विनामूल्य उत्तम  प्रकारे प्रबोधन करतात.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय चौधरी तर आभार मंचचे अध्यक्ष चेतन राजपूत यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वितेसाठी नवरात्र मंडळाचे अध्यक्ष रोहन आठवले,कार्याध्यक्ष सौरभ जैन,महेंद्र पार्टील सह कार्यकत्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रम पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!