जि. प. शाळेच्या माजी विद्यार्थ्याचा देशहिताचा मोठा निर्णय; अमळनेरच्या सुपुत्राचे सर्वत्र कौतुक!

अमळनेर: “अनेक लोक केवळ स्वतःच्या व्यवसायात आणि नफ्यात मग्न असतात, मात्र व्यावसायिक गणितांच्या पलीकडे जाऊन लोकहित आणि देशहिताचे काम करण्यास फार कमी जण धजावतात.” असाच एक देशहिताचा मोठा आणि कौतुकास्पद निर्णय म्हणजे “जिल्हा परिषद शाळेत प्रवेश विद्यार्थी याच्या  पालकांची घरपट्टी माफ करणार असल्याचे अमळनेरचे सुपुत्र सचिन बाळू पाटील यांनी घेतला आहे. त्यांच्या या पावलाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

विशेष म्हणजे, हा निर्णय घेणारी व्यक्ती कोणत्याही हायफाय इंग्रजी माध्यमाची प्रॉडक्ट नसून, आपल्या हक्काच्या जिल्हा परिषद शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. जि. प. च्या शाळेतून प्राथमिक शिक्षण घेऊनही, इच्छाशक्ती आणि कष्टाच्या जोरावर आज त्यांनी यशाचे एक उत्तुंग शिखर गाठले आहे. त्यांच्या या यशामुळे आणि देशहिताच्या निर्णयामुळे जिल्हा परिषद शाळांचा मान पुन्हा एकदा उंचावला आहे.

सध्याच्या परिस्थितीवर टाकले प्रकाशझोत

आजकालच्या समाजात जिल्हा परिषद शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन दुर्दैवाने बदलत चालला आहे. अगदी जि. प. शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांची मुलेही आज इंग्रजी शाळांकडे धाव घेत आहेत, ही अत्यंत खेदाची बाब आहे. अशा वातावरणात, एका जि. प. च्या माजी विद्यार्थ्याने देशपातळीवर घेतलेला हा निर्णय सरकारी शाळांमधील गुणवत्तेवर आणि तिथून घडणाऱ्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करणारा ठरला आहे.

मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव

या देशहिताच्या निर्णयाची दखल घेत ‘दैनिक देशोन्नती’चे जिल्हा संपादक श्री. मनोज बारी साहेब यांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे. तसेच प्रा. डॉ. विजय गाढे (देशोन्नती प्रतिनिधी, अमळनेर) यांनीही या निर्णयाला मनापासून दाद दिली असून, “हा निर्णय केवळ कौतुकास पात्र नसून येणाऱ्या पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे,” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

राजकारणाच्या आणि वैयक्तिक स्वार्थाच्या पलीकडे जाऊन घेतलेला हा निर्णय देशाच्या प्रगतीला हातभार लावणारा ठरेल, यात शंका नाही. अमळनेर तालुक्यातून आणि संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांनी गाव पातळीवर घेतलेला निर्णय हा देशातील राजकारणी व सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा. याच प्रकारे समाजहिताचे निर्णय सर्व राजकारण्यांनी घ्यावा,ही माफक अपेक्षा आहे.

“जि. प. शाळेतील सुप्त गुणांना जर योग्य दिशा मिळाली, तर ती मुले देशहिताचे मोठे निर्णय घेऊ शकतात, हेच या उदाहरणावरून पुन्हा सिद्ध झाले आहे.”

— प्रा. डॉ. विजय गाढे,

मुख्यसंपादक, करडी नजर न्यूज अमळनेर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!