अमळनेर येथील राय फाऊंडेशन तर्फे कामगार दिनांनिमित्त आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.

सविस्तर वृत्त की, दिनांक 2/05/2025 रोजी कामगार दिनानिमित्त राय फाऊंडेशन, अमळनेर यांच्या मार्फत गणपती हॉस्पिटल आणि क्रिटीकेयर डॉ .पंकज संतोष महाजन यांच्या सौजन्याने अमळनेर येथील आर. के.पटेल कारखान्यात कामगारांचे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात १०० ते ११० कामगारांचे आरोग्य तपासणी करण्यात आले.
सदर शिबिराचे उद्घाटन आर के पटेल कारखाण्याचे संचालक मा.विनोद भैय्यासाहेब पाटील आणि मा. बिपीन बापूसाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
शिबिरात हृदयरोग तपासणी, टी.बी,दमा,इ.सी.जी,रक्तातील साखर,एचबीएवनसी, न्यूरोप्याथी,लिपिड प्रोफाइल, ऍसिडिटी स्कोअर व इतर तपासणी करण्यात आल्या.
विशेष सहकार्य राय फाऊंडेशनचे सचिव देवदत्त संदानशिव , अध्यक्ष तुषार संदानशिव , आर.के.कारखाना कामगार अधिकारी हेमंत बेहरे,नारायण पाटील आदींनी शिबिरासाठी परिश्रम घेतले.
