भारत बालविवाह मुक्त करण्यासाठी नागरिकांनीं सजग रहावे …..मंत्री आमदार अनिल भाईदास पाटील यांचे आवाहन

अमळनेर येथील आधार बहुउद्देशीय संस्था जळगाव जिल्ह्यात राबवित असलेल्या जस्ट राईट फॉर चिल्ड्रन प्रकल्पांतर्गत बालविवाह मुक्त भारत या अभियानात अमळनेर येथील आमदार माननीय अनिल दादा पाटील यांनी सहभाग नोंदवून सर्व अमळनेर तालुका वासियांना बालविवाह मुक्तीसाठी आव्हान केले.

 

आमदार अनिल भाईदास पाटील यांनी याप्रसंगी अक्षय तृतीया निमित्ताने देशभर सुरू असलेल्या बालविवाह मुक्त भारत अभियान नागरिकांच्या सतर्कतेने यशस्वी होईल, कायद्याने बालविवाह रोखण्यासाठी धर्मगुरु, समाजातील जबाबदार नागरिक, पालक, गाव समित्या, अधिकारी, कर्मचारी यांनी सजग राहून आपल्या परिसरात बालविवाह रोखण्यासाठी आवाहन केले आहे.

महाराष्ट्र दिवस व कामगार दिन निमित्त कार्यक्रमप्रसंगी प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे , पोलीस उपविभागीय अधिकारी विनायक कोते, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, नगर परिषद मुख्याधिकारी तुषार नेरकर, गट विकास अधिकारी एन.आर.पाटील, अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील, शहर तलाठी आबा सोनवणे, ऍड. तिलोत्तमा पाटील, माजी नगरसेवक मनोज पाटील, दीपक पाटील, नरेंद्र संदानशिव, प्रताप शिंपी, राष्ट्रवादीचे मुख्तार खाटीक, इम्रान खाटीक, बाळू पाटील, अनिल शिसोदे, नगाव माजी सरपंच महेश पाटील याप्रसंगी उपस्थित होते.आधार संस्थेचे अध्यक्ष डॉ. भारती पाटील , संचालक रेणू प्रसाद तसेच प्रकल्प समन्वयक आनंद पगारे, मोहिनी धनगर व सहकारी परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!