अमळनेर येथील सडावण बुद्रुक येथील शेतकरी नागो पुंडलिक पाटील यांच्या शेतातील डी पी (वितरण रोहित्र) वर अचानक झालेल्या लाईन फाल्टमुळे त्यांच्या दोन बिघे क्षेत्रातील उभी ज्वारी जळून खाक झाली. ही घटना दिनांक 30 रोजी घडली.

सविस्तर वृत्त की, सडावन येथील शेतकरी नागो पाटील यांच्या शेतात ज्वारीचे पीक चांगले आले होते आणि ते काढणीसाठी तयार होते. मात्र, अचानक डी पी मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जोरदार स्पार्क झाला आणि आग लागली. वाऱ्यामुळे आगीने वेगाने ज्वारीच्या पिकाला वेढले आणि बघता बघता सर्व पीक जळून गेले.
या आगीमुळे पाटील यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांनी शासनाकडून त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
