अमळनेर ,नगाव खुर्द येथे रेशन दुकान क्रमांक १५२ मध्ये सप्टेंबर २०२६ चे धान्य वितरित न करताच लाभार्थ्यांचे अंगठे घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सरपंचांनी अमळनेरचे प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर पुरवठा विभागाच्या अधिकारी रुकसाना शेख यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून अमळनेर तहसीलदार यांना अहवाल दिला.

