अमळनेर : “हिवताप दुरीकरणसाठी कटिबद्ध: आता हे शक्य आहे आणि हे केलेच पाहिजे,” या घोषणेसह प्राथमिक आरोग्य केंद्र मारवड येथे जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला. जिल्हा आणि तालुका आरोग्य प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाद्वारे ग्रामस्थांमध्ये व्यापक जनजगृती करण्यात आली.

