कोळी लोकांच्या लालबागचा राजाची सत्यकथा
पार्श्वभूमी : मुंबई शहर त्यावेळी आजच्या सारखे भरभराटीला आले नव्हते.मुंबईची लोकवस्ती सुध्दा आजच्या पेक्षा फारच कमी होती.मुंबईतील मासळी बाजार देखील खूप जुने आहेत.वेसावा येथील कोळीमहिला मासळी विकण्यासाठी मुंबई येथील नळबाजार,लालबाग वगैरे मासळी बाजारात जात असत.

त्याकाळात मोटारगाडया नव्हत्या तेव्हा वेसावा येथे मासळीची वाहातूक करण्या साठी.बैलगाड्या किंवा घोडागाडीचे टांगे असायचे.पद्मा लाकडे,आका वगैरेंचे साठे (साठणी) लोकांचे खाजगी टांगे असायचे.तसेच वेसावा येथील सार्वजनिक मासळी वाहातूक करण्याचे अहमदामिया,बच्चू शेठ,हुसेनमिया या मियाभाय लोकांचे टांगे असायचे.नंतर या मियाभाय लोकांच्या ‘चलती का नाम गाडी’ सारख्या मोटारगाड्या आल्या होत्या.आशा काळात लालबागच्या बाजारात इतर कोळीवाड्या प्रमाणे वेसावा येथील कोळी महिला सुध्दा मासळी विकायला जात असत.
अशा या ब्रिटीशकाळात देश स्वातंत्र्य करण्याचे लढ्याचे मुंबई हे केंद्र बनले होते.मिठाचा सत्याग्रह लढा चालू असताना. जागेचे मालक रजबअली तय्यबअली याने लालबागा येथील मासळी बाजाराच्या जागे विषयी हरकत घेतली होती. म्हणून सरकारने लालबाग येथील मासळीबाजार उठविला होता.
आजच्या लालबाग मासळी बाजारासमोर जो मेनरोड आहे.मेनरोडच्या पश्चिमेला पेरुचाळी जवळ कोळी महिला उघड्यावर उन्हा पावसात मासळी विकू लागल्या होत्या. त्यांना खूप त्रास सहन करावा लागत असे.
देश स्वातंत्र्य करण्याच्या लढ्या वेळी सार्वजनिक गणपती मांडण्याची मुंबईत लाट आली होती. म्हणून तेथील मासळीबाजारातील बायकांनी देवाला नवस बोलला होता.
‘ देवा,आमचा पूर्वीचा लालबागचा बाजार आम्हाला मिळवून दिला की,देवा याच बाजारात गणपती मांडू’
गणपतीने कोळी बायकांची प्रार्थना एकली आणि जागेचे मालक रजबअली तय्यबअली याने ही जागा कायमची मासळीबाजारा साठी दिली होती. लालबागचा मासळी बाजार आजच्या ठिकाणी चालू झाला. म्हणून 1934 साली लालबागच्या मासळी बाजारात कोळी महीला गणपती मांडू लागल्या होत्या.1934 सालचा लालबागचा पहिला गणपती होडी चालवीणारा कोळी स्वरुपात होता.
ज्याच्या हाती कागद पेन मिळाला की ते हिकमती करतात.सर्व ठिकाणीचा कोळी इतिहास पुसण्यात येत असतो. म्हणून आपला कोळी इतिहास आपण लिहून दुसर्यास सांगावा.
लेखन-भगवान भानजी, मुंबई
