अमळनेर:गेल्या २४ वर्षांपासून शहरातील पाणी टाकीच्या स्वच्छता झालेली नसल्याचा उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांचा दावा विरोधी गटाचे जीतेंद्र ठाकूर यांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे. निकम हे निव्वळ “स्टंटबाज” असून स्वतःचे अपयश लपवण्यासाठी जनतेची दिशाभूल करत असल्याचा घणाघात ठाकूर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला.

