अमळनेर: धानोरा येथील ४० वर्षीय तरुण बेपत्ता; मारवड पोलिसात नोंद

अमळनेर :तालुक्यातील धानोरा येथील रहिवासी असलेले शंकर दगडू पवार (वय ४०) हे दि. २ मे रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेले असून, ते अद्याप घरी परतलेले नाहीत. याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, शंकर पवार हे त्यांच्या पत्नी अनिता आणि दोन मुलांसह धानोरा येथे राहतात. २ मे रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास त्यांच्या पत्नीने त्यांना जेवणासाठी विचारले असता, त्यांनी “मला भूक नाही, तू जेवण कर” असे सांगितले. रात्री १० वाजता ते घरात झोपलेले होते. मात्र, मध्यरात्री २ वाजता त्यांच्या पत्नीला जाग आली असता शंकर पवार जागेवर दिसले नाहीत.

त्यावेळी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता, त्यांनी आपण ‘अमळनेर येथे आलो आहोत’ असे सांगितले. दुसऱ्या दिवशी, ३ मे रोजी सकाळी १० वाजता पुन्हा संपर्क केल्यावर त्यांनी “येतो आहे” असे सांगून फोन कट केला. मात्र, दुपारनंतर त्यांचा मोबाईल बंद झाला. नातेवाईक आणि सर्वत्र शोध घेऊनही ते मिळून आले नाहीत.

बेपत्ता व्यक्तीचे वर्णन:

नाव: शंकर दगडू पवार (वय ४० वर्षे)

रंग: सावळा, चेहरा गोल, मध्यम शरीरयष्टी.

उंची: ५ फूट.

पोशाख: अंगात पिवळ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट, पायात चप्पल.

भाषा: अहिराणी आणि मराठी बोलतात.

वाहन: ते त्यांच्या ताब्यातील ‘बजाज प्लॅटिना’ (क्र. MH 54 A 1493) या दुचाकीसह गेले आहेत.

याप्रकरणी अनिता शंकर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारवड पोलीस ठाण्यात मिसिंग रजिस्टर नं. १०/२०२६ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सपोनि यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका/२६३८ शरीफखान पठाण हे करीत आहेत.

आवाहन: अशा वर्णनाची व्यक्ती कोणास आढळून आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा मारवड पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!