अमळनेर,पातोंडा येथील विद्युत ठेकेदाराच्या भावाला पैसाच्या वादातून मजु्रांनी केलेल्या मारझोडित गंभीर जखमी झाल्याने मृत्यू. परिसरात उडाला गोधळं.

सविस्तर वृत्त की,पातोंडा येथे विका सोसायटीच्या गोदामात मध्यप्रदेश येथील विद्युत ठेकेदार राजेश शामसिंग प्रजापती याचा भाऊ कैलास शामसिंग प्रजापती हा पातोंडा येथील विका सोसायटी च्या गोदामात झोपले होते. दरम्यान रात्री सलीम उर्फ संदीप धुर्वे , गोपाळ धुर्वे साहुलाल धुर्वे , पंकज सेलू उमरावसिंग , शिवम फुलसिंग यांनी कैलासला उठवून त्वरित ४० हजार रुपये दे म्हणून मागणी करीत त्याच्याशी भांडू लागले. कैलास ने त्यांना आता पैसे नाही सकाळी पैसे देतो म्हणून सांगितले असता चौघांनी कैलासला लोखंडी पाईप आणि लोखंडी पहार ने मारझोड करीत गंभीर जखमी केले.त्यात कैलास बेशुद्ध झाला. हे पाहून आरोपीनें तेथून पळ काढला . दि ३० रोजी सकाळी सुपरवायझर तिवारी मजुरांना घ्यायला गेले असता त्यांना कैलास बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला उपचारासाठी तातडीने धुळे येथे सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. त्याची प्रकृती अतिशय गंभीर असल्याने त्याला इंदोर येथे दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.मात्र मारहाणीत कैलास रात्रीपासून बेशुद्ध होता, जबरदस्त जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तातडीने छिंदवाडा मध्यप्रदेश व परिसरात आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले आहे.
