घरासमोरून जातो म्हणून तरुणाला मारहाण तर भांडण सोडवायला आल्याला बहिणीचा विनयभंग करत आईला ढकलून केले गंभीर..

अमळनेर येथील एलआयसी कॉलनीत राहत असलेल्या तरुणाला घरा समोरून जातो म्हणून मारहाण केली व भांडण सोडवायला आलेल्या तरुणांच्या आईला जोरदार धक्का देऊन गंभीर जखमी केल्याने गुन्हा दाखल.

सविस्तर वृत्त की, शहरातील एलआयसी कॉलनीत राहणाऱ्या बैसाने परिवारातील मुलगा संदीप हा दि २४ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास रस्त्याने जात असतांना कॉलनीतील योगेश बोरसे व प्रणव बोरसे व चंद्रकांत बोरसे यांनी त्याला अडवून आमच्या घरासमोरून का जातो या कारणावरून भांडण करत तिघानी मारझोड केली दरम्यान त्याची बहीण व आई भांडण सोडवायला आल्या असता बहिणीचा विनयभंग तसेच जातीवाचक शिवीगाळ केली व आईला केस ओढून सिमेंटच्या रस्त्यावर खाली पाडले त्यामुळे महिला गंभीर जखमी झाली.तरुणीच्या आईला दुखापत झाल्याने तिला ग्रामीण रुग्णालय नेण्यात आले मात्र तेथून नर्मदा फौंडेशन व नंतर धुळे येथील ओम क्रिटिकल मध्ये दाखल केले होते. महिला बेशुद्धावस्थेत दोन महिने दवाखान्यात असल्याने तरुणीने पोलिसात फिर्याद दिली नव्हती. तरुणीच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला योगेश ,प्रणव व चंद्रकांत तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७४ ,११५ ,११७ , ३५१(२),३५२ , अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३(१)(र)(एस), ३(२)(व्ही ए) , ३ (१)(डब्ल्यू)(१)(२) प्रमाणे मारहाण ,विनयभंग , ऍ ट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास डीवायएसपी विनायक कोते करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!