माजीमंत्री तथा आमदारांच्या निवासा पासून हाकेच्या अंतरावर शिक्षकाचे मोटरसायकलच्या डिक्कीतून लांबवले पैसे….अमळनेर मध्ये चोरीचे प्रमाण वाढल्याने नागरिक भयभीत

अमळनेर येथील शिक्षकाचे मोटरसायकलच्या डिक्कीत ठेवलेले पैसे अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना घडली.

सविस्तर वृत्त असे की, व्यवसायाने शिक्षक असलेले निखिल रत्नाकर पाटील व त्यांची पत्नी पल्लवी पाटील यांनी वैयक्तिक गरजेपोटी पैसे लागणार असल्याने निखिल पाटील जेडीसीसी बँकेत २० हजार रुपये काढायला गेले तर पल्लवी पाटील बडोदा बँकेत ५० हजार रुपये काढायला गेले. दोघांनी बँकेतून पैसे काढल्यानन्तर त्यांनी ते पैसे व बँकेचे पासबुक पल्लवी पाटील यांच्या पर्स मध्ये ठेवून ते मोटरसायकल क्रमांक एम एच १९ एच २३०० च्या डिक्कीत ठेवले आणि शहरातील अण्णाभाऊ साठे चौकातील अरिहत मेडिकल दुकानावर औषधी घेण्यासाठी गाडी लावून औषधे घेण्यासाठी गेले मात्र औषधी घेऊन परत आल्यावर त्यांना डिक्की उघडी आणि पर्स व पैसे गायब झाल्याचे दिसले.विशेष बाब म्हणजे सदरची घटना ही माजीमंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या निवासापासून हाकेच्या अंतरावर आहे.याठिकाणी मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरू असते.तरीही दिवसा ढवळ्या चोरी झाल्याने नागरिकां मध्ये भयाचे वातावरण पसरले आहे. कारण अशीच घटना काही दिवसांपूर्वी घडलेली आहे.एका दाम्पत्याचे 9 लाख रुपयांची बॅग घरा जवळ येताच चोरांनी लांबविली होती मात्र सदर चोरांना पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

सदर घटनेची तक्रार अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!