जिल्ह्यात 161 जणांवर बकरी ईद च्या पारश्वभूमी वर प्रतिबंधात्मक कारवाई 

जळगाव : बकरी ईद सणाच्या पारश्वभूमी वर कायदा व अबाधीत सुव्यवस्था राखण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी कठोर पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील १६१ उपद्रवी व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांना त्यांच्या गावहद्दीत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

बकरी ईदचा सण शांततेत पार पड़ावा आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी उपद्रवी, समाजकंटक, गुंड प्रवृत्तीचे लोक, तसेच यापूर्वी दोषसिद्धी झालेले आणि गोमांस प्रतिबंध कायद्याचे उल्लंघन केलेल्या व्यक्तीवर बीएनएस कलम १६३ नुसार कारवाई करण्यासाठी प्रस्ताव मागवण्यात आले होते.या प्रस्तावांची छाननी करून पोलिसांनी १६१ उपद्रवी व्यक्ती विरु्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे सण काळात शातता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वर वचक बसेल अशी अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!