अमळनेर येथील फटाक्यांसारखा आवाज
काढणारे कर्णकर्कश सायलेन्सरचा वापर करणाऱ्या बुलेटचालकां विरुद्ध वाहतृक पोलिस कारवाईचा बड़गा
उगारतील का,असा प्रश्न सुज्ञ नागरिक करीत आहे.

सविस्तर वृत्त की, शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी फटाक्यांसारखा आवाज काढणारे कर्कश सायलेन्सरचा वापर करणाऱ्या बुलेटचालकां हौदोस वाढला आहे. बहुतांश बुलेटचालक हे संध्याकाळी शहरातील माज रस्त्यावरून कर्कश आवाज करीत फिरत असल्याने रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांना याचा गँभीर त्रास होत आहे. हृदयविकार असलेल्या नागरिकांना याचा जास्त होतो. तसेच बरेच महिला पुरुष हे जेवणानंतर पायी फिरण्यास निघत असतात.नेमके त्याच कालावधीत हे रोडरोमिओं बुलेटचालक भसकन भरधाव वेगाने गाडी जवळुन घेऊन जात असल्याने नागरिक भयभीत होत आहे.त्यांना हृदय विकाराचा झटका सुद्धा येऊ शकतो. अनेकांनी पोलिसांना याबाबत भ्रमणध्वनि द्वारे याबाबत तक्रारी केल्या आहेत. यावर थातुरमातुर कारवाई होते मात्र कायम स्वरूपी पायबंद घालण्यासाठी उपाययोजना होतांना दिसत नाही.
विशेषतः वाहतूक पोलिसांनी शहराच्या वेगवेगळया भागात नाकाबंदी करून ध्वनी प्रदूषण व सामाजिक शांतता भंग करणाऱ्या बुलेटचालकां विरुद्ध
-
मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई:मोटर वाहन कायद्याच्या कलम २३ (४) (ड), १७७ आणि ११९ (२) नुसार ज्यात १२०० रुपये दंड आकारून कारवाई करणे अपेक्षित आहे.

अश्या फटाक्यासारखे आवाज काढणारे सायलेन्सर जप्त करून त्यावर बुलडोझर फिरवून नष्ट केल्या पाहिजे.बूलेटच्या सायलेन्सरमध्ये फेरफार (मॉडिफाय) करण्यात आल्याने त्यातून फठाक्यासारखा आवाज निघतो..बूलेटच्या सायलेन्सरमध्ये फेरफार (मॉडिफाय) करून देणाऱ्या गॅरेज मालका सह कारागीर वर ही कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सुज्ञ नागरिक करीत आहे.
या बाबीवर वाहतूक पोलीस कशी कारवाई करते,हे पाहणे गरजेचे आहे.
