शांतिनिकेतन व जय योगेश्वर विद्यालयाचे स्नेहसंमेलन जल्लोषात संपन्न*

अमळनेर येथील शांतीनिकेतन प्राथमिक व जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवशीय स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.


स्नेहसंमेलनाचे उद्घाटन अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास देवरे साहेब यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील, डॉ अनिल वाणी ,संस्थेचे उपाध्यक्ष तथा प्राचार्य रावसाहेब के.डी पाटील होते.अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब डी . डी पाटील होते.यावेळी मंचावर संचालक बापूसो नंदकुमार पाटील , संचालिका प्रा डॉ. नयना पाटील,संचालक दादासो शैलेंद्र पाटील, धनदाई कॉलेजचे प्राचार्य प्रा. डॉ. लिलाधर पाटील, प्रा. अनिल पाटील, संजय सोनवणे, एस आर जाधव, मुख्याध्यापिका निवेदिता कापडणेकर आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे प्रदर्शन घडविले. स्नेहसंमेलनातील विविध कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला. विद्यार्थ्यांनी गीत गायन, नृत्य , नाटिका असे विविध मनोरंजनपर कार्यक्रम सादर केले. यावेळी मॅथ ऑलिम्पियाड स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच विज्ञान प्रकल्प उपक्रमाची राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल डॉ.भाग्यश्री वानखेडे मॅडम यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी पार्थ कैलास पाटील उर्फ ओम बाबा (इ.७ वी ,)हर्ष शिवाजी मोरे (इ.५ वी) सौ . माधुरी पाटील मॅडम यांनी केले.
संमेलन यशस्वी करण्यासाठी शांतीनिकेतन प्राथमिक व जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!