अमळनेर येथील समाजकार्य महाविद्यालयाच्या ‘रासेयो’ स्वयंसेवकांचे ‘वनराई बंधारा’ प्रशिक्षणात यश

    अमळनेर :  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) विभाग आणि केशव स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय ‘वनराई बंधारा’ प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. या प्रशिक्षण शिबिरात अमळनेर येथील समाजकार्य महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदवत आपले कौशल्य सिद्ध केले.


जलसंधारण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या प्रशिक्षण कार्यक्रमात समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथील स्वयंसेवक प्रेरणा पिंपळे, कोमल जगताप, शिवदास पावरा, पिंटी पावरा, गीता जगताप, सुवार्ता गावित, सचिन साळवे आणि शामराव पारधी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

या प्रसंगी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एस. टी. इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य राजुदादा नन्नवरे, डॉ. शिवाजीराव भोईटे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, रासेयो संचालक डॉ. प्रवीण महाले, डॉ. मनोज इंगोले, कृषी विभाग अधिकारी कुर्बान तडवी, केशव स्मृती प्रतिष्ठानचे भरतदादा अमळकर, निळकंठ गायकवाड, अनिल भाकरे व आदित्य सावळे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी स्वयंसेवकांना वनराई बंधारे उभारणीचे तांत्रिक महत्त्व आणि ग्रामीण भागातील जलव्यवस्थापनातील योगदान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

    या यशस्वी सहभागाबद्दल समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. विजयकुमार वाघमारे व डॉ. अनिता खेडकर यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करत त्यांचे कौतुक केले व पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!