अमळनेर शहर प्रतिनिधी,तालुक्यातील नंदगाव, रंजाणे, आंबारे व खापरखेडा शिवारात बिबट्याचा वाढता वावर आणि प्रादुर्भाव लक्षात घेता शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद विनायक पाटील यांनी अमळनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

