कब्रस्तान परिसर होणार हिरवागार : अमळनेरमध्ये अल खिदमत ट्रस्टचा वृक्षारोपण उपक्रम

अमळनेर : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अल खिदमत ट्रस्ट, अमळनेर यांच्या वतीने येथील मुस्लिम कब्रस्तान परिसरात २५ विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. “आज लावलेले एक झाड म्हणजे उद्याच्या पिढीसाठी दिलेली जीवनाची भेट आहे,” या भावनेतून कब्रस्तान परिसर हिरवागार व सुंदर करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

​या वृक्षारोपण कार्यक्रमास अमळनेर मुस्लिम कब्रस्तान व ईदगाह ट्रस्टचे हाजी सत्तार भाया साहब यांच्यासह अल खिदमत ट्रस्टचे सदस्य उपस्थित होते. विशेष म्हणजे या मोहिमेत लहान मुलांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मुलांच्या हस्ते वृक्षारोपण करून घेत त्यांना वृक्षांचे मानवी जीवनातील महत्त्व, पर्यावरण रक्षण आणि भविष्यासाठी हिरवाई जपण्याची गरज याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!