अमळनेर: दि जळगाव मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी अमळनेर तालुका सहकारी नोकरांची सहकारी पतसंस्था, मर्या. अमळनेर यांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसचिव श्री. अशोक पुंडलीक वाघ यांच्या नावाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.
हा ठराव कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेरचे सभापती दादासो. अशोक आधार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला. सदर बैठकीचे अध्यक्षस्थान संस्थेचे चेअरमन श्री. नरेंद्र धनगर पाटील यांनी भूषविले.
याप्रसंगी व्हाईस चेअरमन श्री. शिवाजी अभिमन मोरे, संचालक श्री. आबा मडकु बावा, श्री. दिनेश लक्ष्मीकांत पाटील, श्री. सुभाष अशोक खैरनार, श्री. नामदेव विनायक मालचे, श्री. प्रदिप वामन धनगर, श्री. निरंक सुभाष पाटील तसेच संस्थेचे सचिव श्री. भगवान कोंडाजी पाटील उपस्थित होते.
ठराव मंजूर होऊन निवड झाल्यानंतर श्री. अशोक पुंडलीक वाघ यांनी चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व संचालक मंडळाचे मनःपूर्वक आभार मानले.
अमळनेर येथील यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यासह मतदारसंघात देखील परिवर्तन होणार असून महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन होईल असा आशावाद राष्ट्रवादी…
अमळनेर ,नुकत्याच झालेल्या विधानसभेच्यां निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले.आता प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वेध कार्यकर्ते व इच्छुकांना लागले…