जळगाव जिल्ह्याचा डंका! ‘भारत टॅलेंट सर्च’ परीक्षेत कार्तिक पाटील जिल्ह्यात प्रथम……अमळनेरच्या सेंट मेरी स्कूलचा विद्यार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत ६८ वा

 अमळनेर : एज्युमिट ॲकॅडमी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) वर आधारित आयोजित करण्यात आलेल्या ‘भारत टॅलेंट सर्च’ (BTS) २०२६ या राज्यस्तरीय परीक्षेत अमळनेर येथील सेंट मेरी इंग्लिश मीडियम हायस्कूलचा विद्यार्थी कार्तिक निलेश पाटील याने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. कार्तिकने जळगाव जिल्ह्यातून जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकावला असून, राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत त्याने ६८ वे स्थान मिळवून तालुक्याचा व जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे.

​स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान

​कार्तिकच्या या घवघवीत यशाबद्दल एज्युमिट अकॅडमी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने त्याला अधिकृत स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन अत्यंत उत्साहात सन्मानित करण्यात आले. त्याच्या या यशामुळे अमळनेर शहर व शैक्षणिक वर्तुळातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

​सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

​कार्तिक पाटील याच्या या यशाबद्दल पंचायत समिती अमळनेरचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्री. प्रमोद पाटील, विस्ताराधिकारी श्री. रावसाहेब पाटील तसेच सेंट मेरी इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या प्राचार्या आणि सर्व शिक्षक वृंदांनी त्याचे कौतुक केले व पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्तिकच्या या यशात त्याचे पालक आणि शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!