अमळनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार) किसान सेल तालुका अध्यक्ष पदी महारु पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.

सविस्तर वृत्त असे की, अमळनेर तालुक्यात राष्ट्रवादी किसान सेलच्या माध्यमतून शेतकरी, कष्टकरी, हातमजुर आणि वंचित लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून त्यांना मदत करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचे विचारांवर चालणारा आणि पक्षाचे ध्येय धोरण तसेच विचार तळागाळापयंत पोहोचवून पक्षाच्या संघटनेला मजबूती करण्यासाठी तालुक्यातील ढेकू येथील महारु पाटील यांची नियुक्ती राष्ट्रवादी किसान सेल तालुका अध्यक्ष या पदावर जिल्हाअध्यक्ष श्री. ईश्वर पंडीत पाटील यांनी केल्याने त्यांचेवर अभिनंदन नाचा वर्षाव होत आहे.
