अमळनेर येथील पंचाळ समाजातील एका कुटुंबाला गट नंबर 323 मधून . जुने बस स्टँड अमळनेर येथून उठवून दुसरीकडे घर देण्याचे आश्वासन नपकडून देण्यात आले होते. मात्र, नपने आश्वासन पूर्ण केले नाही, परिणामी हे कुटुंब अनेक दिवसांपासून रस्त्यावर वास्तव्य करत होते. अशा परिस्थितीत, काल दिनांक १५/०१/२०२५ रोजी या परिवारातील एका व्यक्तीचा रस्त्यावरच मृत्यू झाला, ज्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित कुटुंबाला त्यांच्या राहत्या जागेवरून हटविण्यात आले होते आणि नवीन घर मिळवून देण्याचे वचन दिले गेले होते. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्यांना घर मिळाले नाही, आणि मजबूरीने रस्त्यावरच राहावे लागले. काही दिवसांपासून थंड हवामान आणि अस्वच्छ परिस्थितीमुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला. काल रात्री , त्या परिवारातील एका सदस्याचा रस्त्यावरच मृत्यू झाल्याचे समजते.
या घटने बद्दल नप प्रशासनाशी संपर्क साधला असता,त्यांनी यावर कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया दिली नाही.स्थानिक लोकांनी प्रशासनाच्या या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला असून,या प्रकरणाची सखोल चौकशी व त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
स्थानिक रहिवाशांनी या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, प्रशासनाच्या वचनबद्धतेचा अभाव आणि पुनर्वसनासाठी योग्य व्यवस्था नसल्यामुळे हे संकट ओढवले आहे.गेल्या अनेक वर्षांपासून पुनर्वसनाची प्रतीक्षा करणाऱ्या पंचाळ समाजाच्या कुटुंबांवर हा दुर्दैवी प्रसंग ओढवला आहे. प्रशासनाने त्वरित पावले उचलून अन्य कुटुंबांसाठी सुरक्षित आणि योग्य राहण्याची सोय करावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.
